मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून साताऱ्याला निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक दोष असल्याचे समजल्यामुळे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ दुसरे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले.
पाटण तालुक्यातील दौलतनगरमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शिवाजीराव देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण, महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन व शासन आपल्या दारी योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होता. मात्र, हेलिकॉप्टरच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो बंद पडला. त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंसह उद्योगमंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे होते.
हेही वाचलंत का ?