Latest

Tweet Edit : ट्विटर युजर्संना खुशखबर! आता कधीही करू शकता ट्विट एडिट

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कित्येकवेळा युजर्सकडून ट्विट एडिट करण्याचा पर्याय मिळावा अशी मागणी ट्विटरकडे केलेली पहायला मिळत होती. त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे. पोस्ट केलेले ट्विट आता कधीही एडिट करू शकणार असं ट्विटरने जाहीर केले आहे. ट्विटरने युजर्संना दिलेली ही मोठी खुशखबर आहे. (Tweet Edit)

ट्विटरवर टाकलेल्या मजकूरावर आता "ट्विट एडिट"(Tweet Edit) असे बटण देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटरने Undo Tweet हे फिचर दिले होते. युजर्स आता फेसबुकच्या फिचर प्रमाणे ट्विट देखील कधीही एडिट करू शकणार आहेत. युजर्संना कित्येकदिवस ह्या नव्या फिचर्सची अतुरता लागून राहिली होती. त्यामुळे त्यांची ही प्रतिक्षा आता संपली आहे.

या नव्या बदलाचे टेस्टिंग सुरू

ट्विटरच्या वेबसाईटवर कंपनीकडून या एडिट बटणाविषयीची माहिती देणारे ट्विट करण्यात आलेले आहे. या नव्या बदलाचे सध्या टेस्टींग सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरूवातीच्या टप्प्यात व्हेरिफाईड अकाऊंट असणाऱ्यांना म्हणजेच ब्लू टीक असणाऱ्यांनाच हा पर्याय उपलब्ध होणार आहे. ब्ल्यू टिक असलेल्या सदस्यांना दरमहा ४.९९ डॉलर्समध्ये हे फिचर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुर्तास हे ट्विट एडिट हे नवे फिचर सर्वांसाठी उपलब्ध नाही. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर हा नवा बदल सर्वांसाठी लागू होणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT