मिरजेत गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; दर्ग्यासमोर गणेशाचे आगमन होताच डॉल्बीवर वाजली कव्वाली | पुढारी

मिरजेत गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; दर्ग्यासमोर गणेशाचे आगमन होताच डॉल्बीवर वाजली कव्वाली

मिरज; पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून मिरजेची ओळख आहे. मिरजेत प्रत्येक वर्षी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु मिरजेतील प्रसिद्ध ख्वॉजा मीरासाहेब दर्ग्यासमोरून गणेशाचे आगमन होताना डॉल्बीवर कव्वाली लावून जातीय सलोखा कायम ठेवण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मिरजेतील गणेशोत्सवात मुस्लीम समाज देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो. हिंदू-मुस्लीम गणेशोत्सव मंडळे देखील आहेत. बुधवारी मिरजेत गणेशाचे जोरदार आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध अशा ख्वॉजा मीरासाहेब दर्ग्याजवळ असणार्‍या सर्वोदय गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तीचे देखील डॉल्बीच्या दणदणाटात जोरदार आगमन करण्यात आले. परंतु ही मूर्ती दर्ग्यासमोर आल्यानंतर डॉल्बीवर कव्वाली वाजवून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे परंपरा या गणेश मंडळाकडून राखण्यात आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला आहे.

Back to top button