पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य अभिजित सेन (Economist Abhijit Sen) यांच सोमवारी रात्री (दि. २९) निधन झाले. काल रात्री ११ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अभिजीत यांचे भाऊ डॉ. प्रणब सेन यांनी दिली. अभिजीत हे ७२ वर्षांचे होते.
अभिजीत हे ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ते अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक महत्त्वाच्या सरकारी पदांवर त्यांनी काम केले आहे.
हेही वाचलंत का?