Latest

 Earthquake in Uttarkashi : उत्तरकाशीत एकापाठोपाठ तीन भूकंप

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीत शनिवारी (दि.४)  उशिरा  रात्री  भुकंपाचे सलग तीनवेळा धक्के बसले. भुकंपाचे धक्के जाणवताच स्थानिक लोक घराबाहेर पडले. या भूंकपांनी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती स्पष्ट झालेली नाही. पहिल्या भूकंपाचा धक्का हा १२ वाजून ४० मिनीटांनी,  दुसरा १२ वाजून ४५ वाजता आणि तिसरा ०१ वाजून १ मिनीटांनी जाणवला. ( Earthquake in Uttarkashi)

स्थानिक रहिवासी हेमलता यांनी सांगितले की, अचानक खिडक्या आणि दारांचा मोठा आवाज झाला, तसेच स्वयंपाकघरात ठेवलेली काही भांडीही पडली. एकापाठोपाठ एक असे तीन भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. लोक बराच वेळ घराबाहेर होते.

 Earthquake in Uttarkashi : २.५  रिश्टर स्केल

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, १२ वाजून ४५ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.५ इतकी होती. ज्याचे केंद्र भटवाडी तहसील अंतर्गत सिरोरच्या जंगलात असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपामुळे कुठूनही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT