Latest

Earthquake in Gujarat: गुजरातला भूकंपाचा धक्‍का, ४. ३ रिश्‍टर स्‍केल इतकी तीव्रता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गुजरातमध्ये आज (दि.२६) दुपारी 3 वाजून २१ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता हा ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा राजकोटच्या उत्तर वायव्य (NNW) सुमारे २७० किलोमीटर अंतरावर १० किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ट्विटरवरून दिली आहे.

गेल्या आठवड्यात गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात दोन दिवसांत तीन किरकोळ भूकंपाचे धक्के जाणवले, असे भूकंपशास्त्र संशोधन संस्थेच्या (ISR) अधिकाऱ्याने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले.

याचदरम्यान अफगाणिस्तानातही जाणवले धक्के

याशिवाय याचदरम्यान अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रताही ४.३ इतकी होती. फैजाबादच्या दक्षिणेस ११७ किमी अंतरावर ९८ किमी खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या दोन्ही भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT