Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

Earthquake
Earthquake

पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये आज भूकंपाचे धक्‍के बसले. मिळालेल्‍या माहितीनुसार आज (रविवार) रात्री २ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास हे भूकंपाचे धक्‍के जाणवले. रिश्टर स्‍केलवर या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंदवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्‍याचे वृत्‍त नाही.

भूकंपविज्ञान राष्ट्रीय केंद्राच्या माहितीनुसार सकाळी २ वाजून १४ वाजता अफगाणिस्‍तानच्या फैजाबादपासून २७३ किमी उत्‍तर पूर्वेला ४.३ रिश्टर स्‍केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र भूगर्भात १८० किलोमीटरपर्यंतच्या खोलीवर होते.

दरम्‍यान पापुआ न्यू गिनीमध्येही रविवारी रात्री उशिरा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी होती. तर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपामुळे पृथ्वी हादरली. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 मोजली गेली. यापूर्वी अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर मध्य आशियामध्ये सातत्याने पृथ्वी हादरत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news