Latest

Earthquake in Delhi: दिल्लीत पुन्हा सौम्य भूकंपाचा धक्का

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत भूकंपाची मालिका सुरूच आहे. ३ नोव्हेंबरला रात्री उशिरा नेपाळमध्ये ६.४ भूकंप झाला, यामध्ये मोठ्या प्रमाणत जीवित आणि वित्त हानी झाली. या भूकंपाने राजधानी दिल्ली देखील हादरली होती. त्यानंतर अनेक तीव्र अन् मध्यम तीव्रतेचे भूकंप झाले. यानंतर आज पुन्हा राजधानी दिल्लीत सौम्य भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल अशी अतिशय सौम्य होती. अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. (Earthquake in Delhi)

या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरेकडीत जिल्ह्यात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किमी खोलीवर होता. असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी सोमवारी ६ नोव्हेंबरला ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने दिल्ली हादरली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा २.६ रिश्टर स्केल सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे. (Earthquake in Delhi)

यापूर्वी शुक्रवारी (दि.३) मध्यरात्री झालेल्या शक्तीशाली भूकंपाने दिल्लीसह नेपाळच्या शेजारील प्रदेश हादरला. नेपाळच्या शक्तीशाली भूकंपात १२८ हून अधिक नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली होती. (Earthquake in Delhi)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT