Latest

Earthquake in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: अरुणाचल प्रदेशातील पैंगीनच्या उत्तरेला आज (दि.२८ जुलै) सकाळी ८.५० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या सौम्य भूकंपाची तीव्रता ४.०० रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. अरूणाचल प्रदेशात भूकंप होण्याची ही या आठवड्यातील दुसरी वेळ आहे.

आठवडाभरात दुसऱ्यांदा हादरे

यापूर्वी अरूणाचल प्रदेशमध्ये आणखी एकदा भूकंपाचे धक्के बसले होते. शनिवारी (दि. 22 जुलै) रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT