Latest

Sudan Crisis : ‘8 वर्षांत कमावले 15 दिवसांत गमावले…पुन्हा कधीही जाणार नाही’; सुदानमधून परतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदानमध्ये लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युद्धाची ठिणगी पडली. या संघर्षात तेथील परिस्थिती चिघळली. अशा परिस्थितीत अनेक विदेशी नागरिक देखील तिथे अडकून पडले. भारतातील सुद्धा जवळपास 3000 नागरिक सुदानमध्ये अडकले आहेत. त्यानंतर भारताने ऑपरेशन कावेरी या मिशनच्या माध्यमातून (Sudan Crisis) आत्तापर्यंत ६०० भारतीयांची सुटका केली आहे. सुदानमधून परतलेल्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या संघर्षात आपलं सर्वस्व गमावलं आहे. (Sudan Crisis)

Sudan Crisis : आठ वर्षांत कमावलेलं पंधरा दिवसात गमावलं 

सुदानहून चेन्नईला परतलेल्या आयटी प्रोफेशनल दिव्या राजशेखरन या मदिपक्कम येथील रहिवासी आहेत. जेव्हा संघर्ष सुरू झाला. तेव्हा दिव्या म्हणाल्या, सशस्त्र दलांनी दरवाजा ठोठावला. हिंमत वाढवून त्यांनी दार उघडले. त्यांना विचारण्यात आले की ते भारतीय आहेत का? त्यांचे नुकसान होणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली. त्यांनी त्याच्याकडे अन्न, पाणी आणि पैसे मागितले आणि त्यांची गाडीही घेतली. पुढे सांगताना दिव्या म्हणाल्या, सुदानमधून परत येण्याची सर्व आशा गमावली होती. आता माझ्याकडे फक्त एक जोडी ड्रेस आणि पासपोर्ट शिल्लक होता. गेल्या आठ वर्षांत त्यांनी कमावलेली सर्व कमाई  गेल्या पंधरा दिवसांत गमावली आहे. वाचवण्यासाठी मदत केल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार. संघर्षग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या नऊ तामिळींच्या पहिल्या तुकडीत दिव्या राजशेखरन होत्या.

Sudan Crisis : मी गर्भवती…

दिव्या यांच्यासोबत आलेली सोफिया सांगते की, मी गर्भवती आहे. आम्हाला वाटलं होतं की सुदानमधील हा संघर्ष एक-दोन दिवसात संपेल पण असं झालं नाही. आमचं घर निमलष्करी दलाच्या प्रमुखांच्या कार्यालयाच्या जवळ होते. आमची कार, डॉलर आणि अन्य किमती सामान हिसकावून घेतलं आहे. पुढे म्हणाले की, संघर्षाच्या आठव्या दिवशी आम्ही भटके झालो. सुदैवाने, भारतीय दूतावासाने  अडकलेल्या भारतीयांशी संपर्क साधला आणि त्यांना नवी दिल्लीत आणले. सुदानमध्ये आम्हाला अन्न-पाणी नव्हते. दही, भात आणि लोणचे खाऊन आम्ही कसेतरी सांभाळले.

मरणातून परत आलो, पुन्हा कधीही जाणार नाही

सुदानहून परत आलेले व्यवसायाने अभियंता असलेले  हरियाणाचे सुखविंदर सिंग सांगतात, आपण सर्व जण मृत्यूशय्येवर आहोत असं वाटतं होतं. आम्हाला त्याच परिसरात एका खोलीत बंद करण्यात आलेले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील कारखाना कामगार छोटू म्हणतो, "मी मृत्यूच्या दाढेतून परत आलो आहे." आता मी कधीच सुदानला जाणार नाही. पंजाबमधील होशियारपूर येथील तस्मेर सिंग (६०) सांगतात, वीज आणि पाणी नसलेल्या छोट्याशा घरात ते राहत होते. सुदानमध्ये अशा संघर्षाचा आम्हाला अंदाज नव्हता.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT