नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिंदे गावात एमडी तयार करण्यासाठी कंपनी सुरु करण्यात मुंंबईतील संशयित हरिशपंत याचा सहभाग उघड झाला आहे. त्याने कंपनी उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व एमडीचा कच्चा माल पुरवण्यासोबतच तयार झालेला एमडी मुंबईत विक्री करण्यास सहभाग घेतल्याचे पाेलिस तपासातून समोर येत आहे. (Drug case)
शहर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात एमडी गोदामातून कोट्यवधी रुपयांचा एमडी व कच्चा माल जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज माफीया ललित पानपाटील याच्यासह त्याचा भाऊ भुषण पानपाटील, अभिषेक बलकवडे, रोहित चौधरी, हरिशपंत, शिवा शिंदे, झिशान शेख, यांना अटक केली आहे. त्यापैकी शिवा शिंदे यास न्यायालयीन कोठडी मिळाली असून उर्वरीत संशयित पोलिस कोठडीत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या तपासात शिंदे गावात एमडी फॅक्टरीचा सेटअप उभारण्यात हरिशपंतने मदत केेल्याचे उघड होत आहे. त्यासाठी त्याने यंत्रसामुग्री, कच्चा माल पुरवण्यासोबतच संशयित रोहित याला नाशिकच्या फॅक्टरीत एमडी तयार करण्यासाठी ठेवले होते. याप्रकरणी संशयितांना एमडीचा फॉर्म्युला कोणी दिला व आर्थिक पुरवठा कोणी केला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. (Drug case)
माल रिजेक्ट झालेला
पोलिस तपासात हरिशपंतने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गावात तयार केलेला एमडी मुंबईत विक्रीसाठी नेला होता. मात्र खरेदीदाराने मालात खराबी असल्याचे कारण देत तो रिजेक्ट केला. त्याचप्रमाणे कंपनीत तयार केलेला एमडी पुर्ण विक्री केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यात एमडी तयार केला जात होता. त्यामुळे एमडी विक्री केल्यानंतर दुसऱ्या वेळेस एमडीची मागणी पाहून त्यादृष्टीने कच्चा माल उपलब्ध करून नव्याने एमडी तयार केले जात असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
हेही वाचा :