Latest

Black Tea and Heart Health : ब्लॅक टीने घटतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका

Arun Patil

वॉशिंग्टन : बदलती जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि फास्टफूडला प्राधान्य अशा अनेक कारणामुळे जगभरात हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी करण्यासाठी ब्लॅक टीचे सेवन करावे, असे संशोधकांचे मत आहे. ( Black Tea and Heart Health ) आता ब्लॅक टी म्हणजे काय? दूध आणि साखर नसलेला आणि केवळ चहापावडर घातलेला चहा म्हणजे ब्लॅक टी होय.

Black Tea and Heart Health : नियमित सेवन ठरते फायदेशीर

 भारतात ब्लॅक टी तयार करण्यासाटी कॅमेलिया एसैमिका नामक झाडाचा वापर केला जातो. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनानुसार रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा पिणे आरोग्यासाठी कधी कधी नुकसानकारक ठरू शकते. मात्र, तोच चहा जर साखर अथवा दूध न घालता तयार केलेला असेल तर तो आरोग्यासाठी अत्यंत चांगला ठरतो. ब्लॅक टीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंट गुणांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास उपयोगी ठरते. यामुळेच नियमितपणे ब्लॅक टीचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते. या चहामुळे हृदयाजवळ असलेल्या रक्तवाहिन्यांत गुठळ्या होत नाहीत.

ब्लॅक टीमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होतो. याबरोच शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच नियमितपणे ब्लॅट टीचा वापर केल्यास हाडेही बळकट होण्यास मदत मिळते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT