Latest

Carlos Alcaraz : वयाच्या ४ थ्या वर्षी टेनिसपटू बनण्याचं स्वप्न! २० व्या वर्षी विम्बल्डन विजेतेपद; पहा अल्कारेझचा यशस्वी प्रवास

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविवारी (दि. १७)  विम्बल्डनला नवा चॅम्पियन मिळाला. 20 वर्षीय स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारेझने २३ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करून विम्बल्डन (Wimbledon 2023) जिंकले. या विजयानंतर आता सगळीकडे फक्त कार्लोसचीच चर्चा सुरु आहे. कार्लोस अल्कराझ (Carlos Alcaraz) कोण आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. सोशल मीडियावर अल्कराझचे नाव ट्रेंडिंगला आहे. जाणून घेऊया या नव्या चॅम्पियनविषयी अधिक माहिती.

कार्लोस अल्कारेझचा (Carlos Alcaraz) जन्म ५ मे २००३ रोजी स्पेन येथील एल पालमार, मर्सिया येथे झाला. त्याने वयाच्या ४ थ्या वर्षी टेनिसचे रॅकेट हातात पकडले. वयाच्या ४ थ्या वर्षी त्याने टेनिस खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहिले होतं आणि वयाच्या १५ व्या वर्षी तो एक उत्तम टेनिसपटू अशी ओळख निर्माण झाली. कार्लोसच्या वडिलांचे नाव गोन्झालेझ असून ते देखील उत्तम टेनिसपटू होते. वडिलांकडे पाहून कार्लोस टेनिस खेळायला शिकला.

२०२० मध्ये एटीपी स्पर्धेत अल्कारेझचा (Carlos Alcaraz) खेळ पहिल्यांदा पहायला मिळाला. २०२१ मध्ये क्रोएशिया ओपनमध्ये त्याने पहिले एटीपी विजेतेपद जिंकले. विम्बल्डन २०२३ हे अल्कारेझचे दुसरे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकले होते.

२०२० मध्ये नोवाक, नदालचा पराभव | Alcaraz defeated Novak, Nadal in 2020

कार्लोसच्या (Carlos Alcaraz) या कामगिरीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की, २०२० मध्ये खेळल्या गेलेल्या माद्रिद ओपनच्या उपांत्य फेरीत नोवाकचा आणि उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालचा पराभव केला होता. या युवा खेळाडूने २४ तासांतच दोन्ही दिग्गजांना पराभूत करून आपली क्षमता सिद्ध केली. त्याने यूएस ओपन, रिओ ओपन, मियामी ओपन, बार्सिलोना ओपन आणि माद्रिद ओपनचे जेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT