Latest

Dragon fruit : ड्रॅगन फ्रूटमध्ये सापडला कोरोना विषाणू; सुपरमार्केट्स केली बंद

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्राॅनबद्दल सध्या जगात चिंतेचं वातावरण आहे. जगभरातील बहुतांशी देशांमध्ये ओमायक्राॅनने प्रवेश केलेला आहे. आतापर्यंत कोरोनाचे जितक्या केसेस आल्या आहेत, त्यामध्ये लोकांच्या आहारातून संक्रमण झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्या आता आणखी एका फळाची भर पडली आहे. (Dragon fruit)

चीनमध्ये ड्रॅगन फ्रूटमध्येही कोरोनाचे विषाणू आढळले असल्याचे वृत्त समोर आलेले आहे. कोरोनाचे विषाणू असलेले ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) हे व्हिएतनाममध्ये आलेले आहेत. हे वृत्त समोर आल्याचे कळताच चीनची अनेक सुपरमार्केट्स बंद करण्यात आली आहेत. चीनच्या झेजियांग आणि जियांग्शी प्रांतातील ९ शहरांमध्ये फळांमध्ये केलेल्या तपासणीत कोरोनाचे विषाणी आढळून आले आहेत.

यानंतर कोरोनाचे विषाणू आढळलेले ड्रॅगन फ्रूट ज्यांनी खरेदी केले आहेत, त्यांना विलगीकरणात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर परदेशातून आलेल्या खाण्याच्या पदार्थांचीही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिएतनाममधून येणाऱ्या ड्रॅगन फ्रूटच्या आतातीवर २६ तारखेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

चीनमध्ये मागील आठवड्यात ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आल्याची पुष्टी मिळाली होती. सध्या चीनच्या शीआन शहरात कोरोनाचे केसेस मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यानंतर युझू शहरातही लाॅकडाऊन लावण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत वेगळीच भीती दर्शवली आहे. WHO कडून काही नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमायक्रॉन आपल्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. असे डब्ल्यूएचओ म्हटले आहे  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन जगभरात वणव्यासारखा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर WHO चे आपात्कालीन विभागाचे अधिकारी कॅथरिन स्मॉलवूड यांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT