मुंबई : मनपाच्या परवानगीशिवाय खासगी रूग्‍णालयांत कोविड रूग्‍णांना भरती करण्यास मनाई | पुढारी

मुंबई : मनपाच्या परवानगीशिवाय खासगी रूग्‍णालयांत कोविड रूग्‍णांना भरती करण्यास मनाई

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी दुसर्‍या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, असेही पालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आले असून सरकारने निर्देशित केलेले दर आकारणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

Back to top button