Latest

लोकसंख्येच्या आकड्याकडे नव्हे तर जीडीपी, बेरोजगारी, महागाईच्या आकड्यांकडे पहा : कपिल सिब्बल

सोनाली जाधव

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : चीनला मागे टाकत लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातला सर्वात मोठा देश ठरला असला तरी यापेक्षा जीडीपी, बेरोजगारी आणि महागाईच्या आकड्यांकडे लोकांनी बघितले पाहिजे, असा सल्ला राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला.

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. चीनच्या 142 कोटी 50 लाख लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 142 कोटी 80 लाखांवर गेली आहे. मात्र लोकांनी इतर आकडेवारीवर नजर टाकली पाहिजे. जागतिक बँकेच्या माहितीनुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 17.73 ट्रिलियन डाॅलर्स इतका असून भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार केवळ 3.18  ट्रिलियन डाॅलर्स इतका आहे. चीनमध्ये बेरोजगारी 4.8 टक्के आहे तर आपल्याकडे बेरोजगारीचा दर 7.7 टक्के इतका आहे. महागाईचा विचार केला तर चीनमध्ये केवळ 1 टक्के महागाई असून भारतात महागाईचा दर 5.1 टक्के इतकी आहे, असे सिब्बल यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT