Pamela Chopra : यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांचे निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | पुढारी

Pamela Chopra : यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांचे निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यश चोप्रा यांचे सुमारे ११ वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर पामेला चोप्रा यांच्या जाण्याने चोप्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून पामेला चोप्रा मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते, मात्र, त्यांची प्रकृती आणखीच खालावत गेली आणि त्यांनी बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

पामेला चोप्रा एक प्रसिद्ध पार्श्वगायिका, लेखिका आणि निर्मात्या होत्या. त्या शेवटच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री ‘द रोमॅंटिक्स’ मध्ये दिसल्या होत्या

हेही वाचा : 

Back to top button