पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. ट्रम्प कोर्टात हजेरी लावण्यासाठी आले असता न्यूयॉर्कमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली. (Donald Trump)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी पॉर्नस्टार डॅनियल स्टॉर्म्स हिला तिने तोंड बंद ठेवावे म्हणून पैसे दिल्याप्रकरणी मंगळवारी (दि.३) न्यूयॉर्कच्या मॅनहटन न्यायालयासमोर ते शरण आले होते. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या व्यक्तीस 234 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फौजदारी प्रकरणाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प समर्थकांची संतप्त भावना पाहता न्यूयॉर्क न्यायालयात सुनावणीदरम्यान 25 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. न्यायालय परिसरासोबत ट्रम्प टॉवरच्या आसपास बॅरिकेड्स लावण्यात आले होते. न्यूयॉर्कसोबत वॉशिंग्टनमध्ये कॅपिटल हिल आणि अन्य शहरांतही सुरक्षा वाढवली होती. या खटल्यामुळे 2024 मध्ये पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल होण्याचे ट्रम्प यांचे स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.
पोर्नस्टार डॅनियल हिने ट्रम्प यांच्यासोबत तिचे 2006 मध्ये अनैतिक संबंध असल्याचा दावा केला होता. 2016 मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी स्वत:चे माजी वकील मायकेल कोहेन यांच्या माध्यमातून ट्रम्प यांनी डॅनियल्सला तिने गप्प राहावे म्हणून 130,000 डॉलर अदा केले होते, असा आरोप आहे. अर्थात अमेरिकेत विवाहेतर संबंध गुन्हा नाही. लैंगिक संबंधाबद्दल पैसे देणेही गुन्हा नाही. मात्र, ट्रम्प यांनी पॉर्न स्टारला दिलेला पैसा हा खर्च म्हणून अन्य निवडणूक खर्चात दाखविला, असा त्यांच्यावर आरोप आहे.
युक्तिवाद नंतर न्यायालयाने ट्रम्प यांना सुमारे 1.22 दशलक्ष डॉलरचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला देण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प अटकेनंतर माध्यंमांशी बोलताना म्हणाले की, अमेरिकेत असे काही घडू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. "माझ्या देशाचे निर्भयपणे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे."
हेही वाचा