Gold Smugling : मुंबई विमानतळ बनले भारतातील सोने तस्करीचे सर्वात मोठे केंद्र; 11 महिन्यात 360 कोटीचे तस्करीचे सोने जप्त | पुढारी

Gold Smugling : मुंबई विमानतळ बनले भारतातील सोने तस्करीचे सर्वात मोठे केंद्र; 11 महिन्यात 360 कोटीचे तस्करीचे सोने जप्त

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुंबई विमानतळावर अवघ्या 11 महिन्यात 360 कोटी रुपये किमतीचे 604 किलो तस्करीचे सोने Gold Smuglling जप्त करण्यात आले आहे. चेन्नई विमानतळावरून 374 किलो आणि दिल्ली विमानतळावर 306 किलो वजनाचे तस्करीचे सोने जप्त करण्याचा विक्रमाला मागे टाकत मुंबई विमानतळ हा सोने तस्करीत देशातील पहिल्या क्रमांकाचे विमानतळ बनले आहे.

Gold Smugling : सोने तस्करीसाठी ज्वेलर्ससह अनेक सिंडिकेट रॅकेटर्सना आर्थिक मदत करतात

टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, मौल्यवान धातूसाठी मोठी बाजारपेठ असल्याने सोन्याच्या तस्करांसाठी मुंबई हे ट्रान्झिट हब आहे. ज्वेलर्ससह अनेक सिंडिकेट रॅकेटर्सना आर्थिक मदत करतात, असे कस्टम अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या इतर तीन मेट्रो शहरांनाही आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी प्राधान्य दिले जाते. हैदराबादमध्येही तस्करीच्या घटनांमध्ये हळूहळू वाढ झाली आहे. गतवर्षी जप्त केलेल्या ५५ किलोच्या तुलनेत यावर्षी १२४ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

महामारीपूर्वी, 2019-20 मध्ये, दिल्ली विमानतळावर 494 किलो, मुंबई 403 किलो आणि चेन्नई 392 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले होते. 2020-21 मध्ये, सोन्याची तस्करी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. या काळात चेन्नई विमानतळावर 150kg, कोझिकोड येथे 146.9kg, दिल्ली येथे 88.4kg आणि मुंबई येथे 87kg सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

ऑक्टोबर 2022 पासून मुंबईत सोन्याची तस्करी करताना 20 हून अधिक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. 10 फेब्रुवारी रोजी, सीमाशुल्क अधिकार्‍यांनी शहर विमानतळावर 9 कोटी रुपयांच्या 18 किलो सोन्याच्या तस्करीला मदत केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या क्रू सदस्यासह दोन केनियन नागरिकांना अटक केली. या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक म्हणजे 23 जानेवारी रोजी DRI ने काळबादेवी ज्वेलर्सकडून 22 कोटी रुपयांचे 37 किलो सोने आणि 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये तस्करांनी मशीन रोटर्सच्या मालामध्ये धातू लपवून ठेवला होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये विमानतळावर 28 कोटी रुपयांच्या 53 किलो सोन्याच्या तस्करीची चौकशी करणाऱ्या एअर इंटेलिजन्स युनिटने निरज कुमार याला अटक केली होती.

Gold Smugling : आयात शुल्क वाढल्यामुळे तस्करी वाढली

वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, आयात शुल्क 7.5% वरून 12.5% पर्यंत वाढल्यामुळे भारतात 2022 मध्ये मौल्यवान धातूची तस्करी 33% वाढून 160 टनांवर पोहोचली आहे. ग्राहक सध्या अतिरिक्त 3% GST सह, शुद्ध सोन्यावर 18.45% कर भरतात. याशिवाय, सोन्याच्या किमती 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेल्याने, सोन्याच्या तस्करीचा “नफा” 15% वरून 20% पर्यंत वाढला आहे. अधिकारी म्हणतात, भारत आता पुरुषांना 20 ग्रॅम आणि महिलांना 40 ग्रॅम सोने आणण्याची परवानगी देतो.

ज्वेलर्सनी सांगितले की, भारतात दरवर्षी एकूण 720 टन सोने येते, त्यापैकी 380 टन 15% आयात शुल्क आणि 3% IGST सह कायदेशीररित्या प्रवेश करतात आणि उर्वरित 340 टन, तस्करी होते. एका IRS अधिकाऱ्याने सांगितले की भारत प्रति वर्ष सुमारे 900 टन सोने आयात करतो.

Gold Smuglling : 73% तस्करीचे सोने म्यानमार आणि बांगलादेशातून आणले

डिसेंबर 2022 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जारी केलेल्या ‘भारतातील तस्करी 2021-22’ अहवालात 2021-22 मध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्यांपैकी 37% म्यानमारमधील आणि 20% पश्चिम आशियातील असल्याचे दिसून आले. एकूण 73% तस्करीचे सोने म्यानमार आणि बांगलादेशातून आणले गेले. WGC ने म्हटले आहे की भारतात अवैधरित्या व्यापार केलेल्या सोन्याच्या जप्तीचा दर फक्त 2% आहे.

हे ही वाचा :

Twitter logo changed : ट्विटरवरील’ब्लू बर्ड’ गेला, त्‍याच्‍या जागी ‘डॉगी’ आला!

‘पुणे तिथे काय उणे’ ! शिरूरमधील अवलियाने बनवला लाकडी स्कॅनर

‘किंसिंग’ प्रकरणी अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी ‘दोषमुक्‍त’आदेश कायम

Back to top button