Latest

gas cylinder rates : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

घरगुती गॅसच्या दरातून सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या, बुधवारी एलपीजीच्या समीक्षा बैठकी दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ( gas cylinder rates ) कपात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात होवू शकते,असे बोलले जात आहे. याशिवाय पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता केंद्र सरकार पेट्रोल तसेच डिझेलप्रमाणेच गॅस सिलिंडरच्या दरातही कपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिवाळीपासून एक्साईज ड्युटी आणि वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. दरम्यान, दिवाळीच्या आधी एलपीजी महागाईचा भडका उडाला होता. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ( gas cylinder rates ) २६६ रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान, यातील दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ कमर्शियल सिलिंडरमध्ये झाली होती. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

दिल्लीत कमर्शियल सिलिंडरचे दर २ हजारांपेक्षा अधिक आहेत. आधी हा दर १७३३ इतका होता. मुंबईत १६८३ रूपयांना मिळणारा १९ किलोचा सिलिंडर १९५० रुपयांना झाला आहे. तर, कोलकातामध्ये १९ किलो इंडेन गॅस सिलिंडर २०७३.५० रूपये, चेन्नईत आता १९ किलो सिलिंडरसाठी २१३३ रुपये खर्च करावे लागत आहेत.

घरगुती सिलिंडर दिल्लीत १४.२ किलो विना सबसिडी गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रूपये इतकी आहे. ६ ऑक्टोबरला या दरात वाढ झाली होती. तर, एक ऑक्टोबरला केवळ १९ किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे दर वाढवले होते. कोलकाता आणि चेन्नईमध्ये आताही १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडर ९१५.५० रूपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती पाहता गॅस सिलिंडर एक हजार रूपयांचा टप्पा पार करणार अशी शक्यता व्‍यक्‍त केली जात होती.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT