केटरिंग व्यवसायाला सुगीचे दिवस | पुढारी

केटरिंग व्यवसायाला सुगीचे दिवस

दापोडी : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे केटरिंगचा व्यवसाय बंद होता; सध्या मात्र लग्नसराई, येणार्‍या निवडणुकांमुळे बंद असलेल्या केटरिंग व्यवसायास सुगीचे दिवस येत आहेत. लॉकडाऊननंतर मंगल कार्यालये व हॉल गजबजू लागल्यामुळे अनेक बेरोजगार महिला व तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.

ऐन लग्न सराईच्या हंगामात कोरोना महामारीचा फटका शहरातील मंगल कार्यालयाबरोबरच चविष्ट पक्वान्न बनविणार्‍या केटरर्सना बसला होता. लॉकडाऊननंतर सर्वच सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रमावर बंधने आली होती. अनेकांंच्या घरातील लग्न कार्याचे नियोजन फिस्कटले होते. शहरातील बहुतांश मंगल कार्यालये, सांस्कृतिक हॉल यांना कुलूप लागले होते. प्रशासनाकडून कधी परवानगी मिळते, याची केटरर्स वाट पाहत होते.

बीड : शौचास गेलेल्‍या युवकाचा विजेच्या धक्‍क्याने मृत्‍यू

गरजूंना रोजगार उपलब्ध

दापोडी परिसरात या केटरिंग व्यावसायाकडे स्वयं रोजगार म्हणून पाहिले जाते. कारण झोपडपट्टी धरकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कमी शिक्षण असल्याने बहुतांश तरुण केटरिंगच्या व्यावसाकडे वळतात. हा व्यवसाय न्याहरीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत चालतो. केटरिंग अंतर्गत मंगल कार्यालय, खासगी पार्टी, वसतिगृहे, कार्यालय व घर आदीपासून खास आणि सामान्य लोकांपर्यंत नाश्ता, जेवणाच्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये तयार अन्नाची घरपोच सेवा देखील दिली जाते. केटरिंगच्या व्यवसायाला मनुष्यबळाची गरज असल्यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. अनेक गरजवंत या व्यवसायाशी जुळवणूक करुन घेत आहेत.

पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; नागरिकांना नाहक त्रास

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाकडे स्वतःपुरते अन्न शिजविण्याइतकाही वेळ नसतो. अशा परिस्थितीत केटरर्स त्यांची गरज पूर्ण करु शकतात. शहरात हजारो मंगल कार्यालये व हॉल उपलब्ध आहेत. स्वयंरोजगारासाठी केटरिंग हा एक चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक महिला व तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. सध्या शहर परिसरात केटरिंग व वेटरना सुगीचे दिवस येत आहेत.

मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार

रोजचा दिवस धावपळीचा

दोन महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येवून ठेपली आहे. त्यामुळे केटरिंगचा व्यवसाय जोमात सुरु आहे. प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारीचे बाशिंग बांधून बसले आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवित आहेत. त्यातच या ना त्या कारणांनी जेवणावळीवर भर देत आहेत. त्यामुळे केटरिंग व्यवसायातील वेटर्स काम करणार्‍यांचा रोजचा दिवस धावपळीचा असून, त्यातून त्यांना चांगले अर्थार्जन होत असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

आर. हरी कुमार यांनी स्वीकारला नौदल प्रमुखपदाचा कार्यभार

दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे केटरिंगचा व्यवसाय बंद होता. व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उदरनिर्वाह जिकिरीचा बनला होता. आता केटरिंगचा व्यवसाय सुरू झाल्यामुळे केटरिंग व वेटरना पण काम मिळत आहे. आठवड्यात पाच-सहा दिवस काम मिळत आहे. दिवसाला पाचशे ते सातशे रुपये रोजगार मिळत आहे.
-केटरिंग व्यावसायिक, दापोडी.

Back to top button