Latest

डोंबिवली : ५ जणांच्या टोळीकडून ७० लाखांचा मांडूळ साप जप्त

अविनाश सुतार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : काळी जादू करण्यासाठी वापर होत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या टोळीला डीसीपी स्कॉडने अटक केली. ५ जणांच्या टोळीकडून ७० लाखांचा साप जप्त करण्यात आला. दरम्यान, या टोळीतील एक जण पळून गेला असून या टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. निलेश हीलीम, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटेला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मधुकर हा पसार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पालघर येथे राहणारे काही लोक मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. त्यानंतर डीसीपी स्कॉडचे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे यांच्यासह इतर कर्मचारी पथकाने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अग्रवाल कॉलेजजवळ सापळा रचला.

यावेळी ३ दुचाकीवरून ६ लोक येताना पोलिसांना दिसले. पथकाला संशय आल्याने त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे मांडूळ साप आढळला. हा साप ते ७० लाख रुपयांना विकणार होते. यामधील काही जण पालघर, भिवंडी, टिटवाळा परिसरात राहणारे आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT