Latest

मेडिक्लेम विमा घेताना OPD कव्हर घ्यावा का? ही खातरजमा नक्की करा | OPD Mediclaim Cover

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपचारांचा खर्च हा दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होऊन उपचार घेण्यासाठी येणाऱ्या खर्चापासून संरक्षण व्हावे, म्हणून मेडिक्लेम विमा घेतला जातो. पण आता बाह्यउपचारांचा (OPD) खर्चही काही हजारात जाऊ लागल्याने मेडिक्लेम घेताना त्यात OPD कव्हरही घेणे आवश्यक ठरले आहे. बऱ्याच विमा कंपन्या आता मेडिक्लेममध्येच OPD कव्हर देऊ लागल्या आहेत. OPD Mediclaim Cover

OPD मध्ये कशाचा समावेश होतो? OPD Mediclaim Cover

ओपीडी याचा अर्थ Out Patient Department यात हॉस्पिटलायझेशनचा समावेश नसतो. ओपीडी कव्हरमध्ये डॉक्टरांची फी, तपासण्या आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे यांच्या खर्चाचा समावेश आहे. ओपीडी कव्हर घेताना तिन्ही भागाचा समावेश आहे का नाही, याची खातरजमा करून घ्यावी. काही कंपन्या या तिन्ही घटकांना संरक्षण पुरवतात तर काही कंपन्या औषधांच्या खर्चाला संरक्षण देत नाहीत.

अॅड ऑन कव्हर की नवी पॉलिसी OPD Mediclaim Cover

रुग्णालयात भरती होऊन जे उपचार करावे लागतात, त्यासाठी मेडिक्लेम विमा अशी पारंपरिक समज आहे. त्यामुळे ज्या जुन्या मेडिक्लेम पॉलिसी आहेत, त्यात ओपीडीचा कव्हर नसतो. पण ओपीडीसाठी जुन्या पॉलिसींसाठी अॅड ऑन ओपीडी कव्हर घेऊ शकता.
आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो, त्या वेळी डॉक्टरांची फी द्यावी लागते. याला Consultation Fee म्हणतात. काही कंपन्यांनी Consultation वर मर्यादा घातलेली असते. तर काही कंपन्या वर्षांत कितीही Consultationना कव्हर देतात. मोठ्या शहरात Tele Consultation ची पद्धतही वाढलेली आहे, त्याची फी यात कव्हर होते.  OPD Mediclaim Cover

मर्यादा किती?

काही हजार ते ५० हजार रुपयेपर्यंत OPD कव्हर देणाऱ्या पॉलिसी उपलब्ध आहेत. आपली मूळ मेडिक्लेम पॉलिसी किती रकमेची आहे, त्यावरही हे अवलंबून असते.

OPD कव्हर घेताना काय खारतजमा कराल?

  • जो OPD कव्हर वापरला गेला नाही, तो पुढील वर्षीच्या कव्हरमध्ये जमा होणार का? बऱ्याच कंपन्या ८० टक्केपर्यंत रक्कम कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी देतात.
  • नवी पॉलिसी घ्यावी लागणार की आताच्या पॉलिसीवर टॉपअप मिळणार आहे.
  • ओपीडी कव्हर पूर्ण कुटुंबासाठी आहे, की प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र कव्हर घ्यावा लागणार आहे.
  • ओपीडी कव्हर घेताना आपल्या शहरातील उपचार खर्चांचा अभ्यास करावा.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT