Latest

अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानत नाही : आमदार पडळकर

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांना मुळात आम्ही उपमुख्यमंत्री मानत नाही. हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आरक्षणाबाबत मी त्यांना पत्र देण्याचा प्रश्नच नाही. ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

अजित पवारांची आमच्याबाबतची भूमिका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. दरम्यान, पडळकरांच्या या टीकेवर अजित पवार यांनी मौन पाळले. मात्र त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अत्यंत आक्रमक आणि आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना आवरावे. या मंगळसूत्र चोराला बारामतीच्या लोकांनी आधीच त्यांची पात्रता दाखवून दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT