Latest

omicron strain : ओमायक्रॉनचा फैलाव चिंताजनक; पुढील ६ ते ८ आठवडे महत्वाचे

backup backup

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' स्ट्रेनचा वाढता फैलाव चिंताजनक असून देशासाठी पुढील 6 ते 8 आठवडे महत्वपूर्ण असल्याचा इशारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आणि मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहन यांनी बुधवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिला. (omicron strain)

ओमायक्रॉन स्ट्रेन भारतात आहे की नाही, याबद्दल काही दिवसांपूर्वी आम्हाला धाकधूक होती. आता हा स्ट्रेन देशात वेगाने फैलावत असल्याची चिंता आहे, असे सांगून डॉ. त्रेहन म्हणाले की, डेल्टा स्ट्रेनच्या तुलनेत तीन ते चार पट अधिक वेगाने ओमायक्रॉन पसरतो.

omicron strain : होस्टेलमधील ९०० मुलांना कोरोनाची बाधा

ब्रिटन, अमेरिका आणि दुबईचे आकडे पाहिले तर एका लाटेप्रमाणे हा विषाणू पसरत असल्याचे दिसून आले आहे. एका महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये ९०० मुले होती आणि त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली. दुबईत एका पार्टीमध्ये 45 लोक सामील झाले होते, त्यातील ४० लोक बाधित आढळले.

भारतात ओमायक्रॉन स्ट्रेनचे नेमके किती रुग्ण आहेत, ते सांगता येणार नाही. कारण जीनोम सिक्वेंसिंगला वेळ लागतो. आणि प्रत्येक नमुन्याची जीनोम सिक्वेंसिंग केली जाऊ शकत नाही.

तिसरी लाट प्रभावी नाही

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्रांनी सांगितले आहे की, मागील आठवड्यात नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांमध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ टक्के होती. परंतु, आता ती ७३ टक्क्यांवर गेलेली आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन या व्हेरियंटमुळे घराघरांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारीही हळुहळु वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ म्हणतात की, "कोरोनाची तिसरी लाट नक्की येईल. परंतु, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत त्याचे परिणाम गंभीर नसतील."

कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन व्हेरियंटच्या उत्पत्तीचा आणि संसर्गाचा वेग जास्त महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही जास्त आहे. या संसर्गाच्या वेगाला आरटी व्हॅल्यू असंही म्हणतात. एक आरटी व्हॅल्यू म्हणजे एक बाधित रुग्ण दुसऱ्या बाधित रुग्णाला तो आजार पसरवणे.

SCROLL FOR NEXT