Latest

Shravan Special : श्रावणातील उपवासासाठी ट्राय करा कच्च्या केळांची चकली

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्रत- वैकल्याचा म्हणजे, श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात खास करून स्त्रिया आणि मुली भगवान शंकराची पुजा करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासाचेही महत्व अधिक आहे. सामान्य महिला उपवासासाठी नेहमी फक्त साबुदाण्याची खिचडी, केळाचे वेफर्स आणि गोड शाबूचिवडा किंवा तिखट शाबूचिवडाच खातात. या पदार्थासोबतच श्रावणात उपवासाला स्पेशल कच्च्या केळांची चकली ट्राय करा. केळाची चकली फार काळ टिकते आणि कधीही उपवासाला तळून खाता येते. यामुळे स्पेशल उपवासासाठी कच्चा केळांची चकली कशी बनवावी? हे जाणून घ्या… ( Shravan Special )

साहित्य

३-४ कच्ची केळी
एक वाटी भिजलेला शाबूदाणा
२-३ हिरव्या मिरच्या
एक लहान चमचा जिरे
चवीपुरते मीठ
तळणीसाठी थोडं तेल

कृती

गॅसवर पाणी ठेवून त्यात ३-४ कच्ची केळी पाच मिनिटांपर्यत शिजवून घ्यावीत.

थंड झाल्यानंतर केळ्याच्या साली काढून ती मिक्सरमध्ये किंवा घरातील किसणीने बारीक करावीत.

यात एक वाटी रात्री भिजत ठेवलेला शाबूदाणा घालावा.

या मित्रणात एक चमचा जिरे, बारीक चिरलेली मिरची, चवीपुरते मीठ घालावे.

हे सर्व मिश्रण एकत्रित करून गोळा तयार करावा.

यानंतर एका वाळवण वाळवण्याच्या कागद घेवून त्यावर चकल्या करण्यासाठीच्या साचाने गोल चकल्या पाडाव्यात.
(टिप- या चकल्या गोल आल्या नाहीत, तरी एका रेषेत घातल्या तरी चालतात.)

हे वाळवण दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळवावे.

यानंतर मंद आचेवरील गॅसवर तेल गरम करून त्यात या चकल्या सोडाव्यात.

केसरी रंग येईपर्यत चकल्या चांगल्या तळून घ्याव्यात.

यानंतर उपवासाच्या दिवशी अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यत खंमग चकल्या सेव्ह करा.

(या चकल्या उन्हात वाळवण्याने फार काळ टिकतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा वापरता येतात.) (Shravan Special )

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT