Latest

Diwali and Health : दिवाळीत आरोग्‍याकडे दुर्लक्ष नको, ‘या’ टिप्‍स करतील तुम्‍हाला मदत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिवाळी एक आनंदोत्‍सव. सणाचा राजा असणार्‍या दिवाळी सणात सर्वांचीच एकच धावपळ उडते. फटाक्‍यांचे  प्रदूषण असो की फराळ पदार्थांचे अतिखाणं याचा आरोग्‍यावर परिणाम होतो. ( Diwali and Health) आरोग्‍य चांगले असेल तरच सणांचा मनमुराद आनंद घेता येतो. जाणून घेवूया दिवाळीत आरोग्‍याची काळजी कशी घ्‍यावी याविषयी…

अति खाणे टाळा

दिवाळीत आहारात चविष्ट फराळाबरोबर गोड पदार्थांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. नातेवाईक आणि मित्रांची भेट होते. या आनंदोत्‍सवात नकळत अति खाणे होते. त्‍यामुळे पोटाच्‍या समस्या उद्भवू शकतात. पित्त विकारात वाढ होउ शकते. घराबाहेरचे खाणे आणि अति खाण्यामुळे पोट बिघडते.  पित्तविकाराबरोबरच डोकेदुखीचाही त्रास होण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे दिवाळीत अति खाणे टाळा. तसेच आहारात पालेभाज्या, ताजी फळे आणि काजू यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

पुरेशी झोप घ्‍या, व्‍यायाम टाळू नका

दिवाळी सणाचा आनंद नातेवाईक आणि कुटुंबीयांबरोबरच असतो.  दिवाळीनिमित्त सर्वजण एकत्र येतात. त्‍यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण होते. मात्र पुरेशी विश्रांती घेतली नाही तर याचा आरोग्‍यावर परिणाम होतो. अपुर्‍या झोपेमुळे तुमचा मूडही बदलू शकतो. त्‍यामुळे पुरेशी विश्रांती घेणे याला प्राधान्‍य द्‍या. चांगला मूड आणि आरोग्यासाठी 6-8 तास झोप आवश्‍यक घ्‍या. दिवाळीत दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाल ठेवा. नियमित व्‍यायाम चुकवू नका. किमान ३० मिनिटे चाला.

Diwali and Health : महिलांनी अतिश्रम टाळावे

दिवाळीत महिलांची धावपळ वाढते. साफसफाई, कार्यक्रमांचे आयोजन, सजावट, विविध पदार्थांसह त्‍यांना स्‍वयंपाकही करावा लागतो. अचानक शारीरिक हालचली वाढतात. तसेच अति तळलेले पदार्थही खाण्‍यामध्‍ये येतात. याचा परिणाम शरीरावर होतो. त्‍यामुळे दिवाळीत महिलांनी अतिश्रम टाळाणे हिताचे ठरते. अतिश्रम टाळण्‍याबरोबरच स्वतःला हायड्रेटेड ठेवत सर्वांनीच पुरेसे पाणी पिणे हितकारक ठरते.

अल्‍कोहाल टाळा

दिवाळीच्‍या सणात आनंद व्‍यक्‍त करण्‍याच्‍या प्रत्‍येकाची पद्‍धत वेगळी असते. मात्र दिवाळीची सुटीमुळे काही जणाचे अल्‍कोहाल सेवनाचे प्रमाण वाढते. मधुमेह आणि उच्‍च रक्‍तदाब असणार्‍यांनी तर अल्‍कोहोलपासून लांब राहणे हिताचे ठरते.

ध्‍वनी आणि वायू प्रदूषण करु नका

दिवाळी फटाके आणि मोठ्‍या आवाजातील संगीतामुळे ध्‍वनी आणि वायू प्रदूषणाला हातभार लागतो. त्‍यामुळे तुम्‍ही स्‍वत:पासून सुरुवात करा. अति आवाजाचे फटाके आणि संगीताचा दणदणाट टाळात दिवाळी आरोग्‍यदायी करा.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT