Latest

Diwali 2023 : मुंबई : माहीमच्या कंदील गल्लीत आकाश कंदील बनविण्याची लगबग

मोहन कारंडे

धारावी; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीचा (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने माहीम पश्चिम कवळी वाडीतील कंदील गल्लीत आकाश कंदील (Akash Kandil) बनविण्याची एकच लगबग सुरु आहे. येथील रहिवाशांनी छंद म्हणून जोपासलेला उद्योग चांगलाच बहरला असून ग्राहकांची मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी कवळी वाडीतील सर्वच कुटुंब कंदील बनविण्याच्या कामात गुंतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

माहीमच्या कवळी वाडीत गेल्या ४२ वर्षापासून कंदील (Akash Kandil) बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरु असल्याने कवळी वाडीची ओळख कंदील गल्ली म्हणून झाली. सध्या प्लास्टिक व थर्माकॉल बंदीमुळे व्यवसायाचे स्वरूप पालटले त्याऐवजी कापड, नेट, कागद व पुठ्ठेयाचा सर्रास वापर केला जात आहे. इकोफ्रेंडली कंदील बनविण्यासाठी महागड्या रंगीबिरंगी नक्षीदार पैठणी व सिल्क साड्या, जाळीदार कापड, कागद व पुडुयांचा वापर केला जात असून कच्चे मटेरियल महाग असल्याने सालाबादप्रमाणे यंदाही आकाश कंदिलाच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील एकमेव आकाश कंदील बाजार असल्याने मुंबईसह पुणे, अमेरिका व दुबई, कतार येथून कंदील घेण्यासाठी अनेक सेलिब्रेटी या कंदील बाजाराला भेट देतात. (Diwali 2023)

याबाबत सूर्यकांत दत्तात्रय पोखरे म्हणाले, कंदिलाचा (Akash Kandil) व्यवसाय महागाई, चायना मालाची घुसखोरी तसेच सरकारी प्लास्टिक व थर्माकोल बंदी अशा तिहेरी संकटात सापडला आहे. यामुळे या पारंपरिक घरगुती व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. असे असताना ऐन महागाईच्या काळात हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी कवळी चाळीतील कुटुंब सरसावल्याचे दिसत आहे. यावेळी कंदील बाजारात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या लहान मोठ्या आकारातील जगदंब कंदीलची मोठी धूम दिसत आहे. त्या खालोखाल पुष्पा कंदील, आकाश कंदील, करंजी कंदील, अनार कंदील, ट्रिपल कागदी मटका कंदील, साडी कंदील, कागदी बॉल, नेट कंदील, कार्टूनसारखे डोळे दिपवून टाकणारे वेगवेगळ्या आकारातील कंदील बनविण्याचे काम जोरात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

या कंदिलांना सर्वाधिक मागणी (Diwali 2023)

जगदंब कंदील १२०० ते १५०० रुपये, पुष्पा कंदील – ४५० ते ५०० रुपये, फ्लोरोसेंट कार्डबोर्ड कंदील ४५० रुपये, फ्लॉवर वॉल कंदील ४५० रुपये, बटरफ्लाय कंदील ४५० ते ५०० रुपये, आकाशदीप कंदील ३०० ते ८०० रुपये, करंजी कंदील – २०० ते ५०० रुपये, अनार कंदील (छोटा) ५० ते १०० रुपये, अनार कंदील (मोठा) १५० ते २५० रुपये, डबल मटका बटर कंदील २०० रुपये.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT