Latest

पिंपरी : पूर्वीप्रमाणे प्रभाग करा, सुनावणीत तक्रारदारांचे म्हणणे

backup backup

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : आमचा भाग दुसर्‍याच प्रभागाला जोडला आहे. गाव, वस्ती व हाऊसिंग सोसायटीचा परिसराचे तुकडे केले आहेत. गरज नसताना दुसरीकडील भाग जोडला आहे. एकसंध भाग विखुरला आहे. पूर्वीप्रमाणे एकसंध प्रभागरचना करावी, अशा तक्रारी हरकतदारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नोंदविला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागरचनेच्या आरूप आराखड्याबाबत सुनावणीस शुक्रवारी (दि.25) सकाळी दहाला चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात सुरूवात झाली. प्रभागनिहाय हरकतींवर सुनावणी सुरू असून, त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे.

राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

तक्रारदारांच्या म्हणणण्यानुसार प्रभागरचना कशी असेल, त्याचा स्क्रिनवर नकाशा दाखविला जात आहे. हरकती नोंदविणार्‍यांमध्ये विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अ‍ॅडव्होकेट, ज्येष्ठ नागरिक, हाउसिंग सोसायटीचे पदाधिकारी व नागरिक यांचा समावेश आहे. त्यामुळे ऑटो क्‍लस्टर परिसरात मोटारींची गर्दी झाली होती.

एक व आजूबाजूच्या प्रभागाच्या हरकतीचे गट करून त्याप्रमाणे नागरिकांना बोलाविले जात आहे. म्हणणे ऐकून घेऊन तक्रारदारांला पाठविले जात आहे. अनेक तक्रारदार गैरहजर असल्याचे चित्र आहे. ही सुनावणी सायंकाळी उशीरापर्यंत चालणार आहे. त्याचा अहवाल 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास पाठविला जाणार आहे.

SCROLL FOR NEXT