Latest

District Bank Directors : नाव शेतकर्‍यांचे; सत्ता नेत्यांची, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यातील जिल्हा बँकेत ८४ पैकी २२ लोकप्रतिनिधी संचालक

backup backup

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : जिल्हा मध्यवर्ती बँका या त्या-त्या जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेच्या नाड्या असतात. शेती पतपुरवठ्याच्या माध्यमातून सार्‍या जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी होणारी टोकाची लढाई कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांनी पाहिली आहे. या जिल्ह्यातील 84 पैकी 22 जागांवर खासदार, आमदार आणि मंत्री हेच संचालक आहेत. नाव शेतकर्‍यांचे आणि नाड्या नेत्यांच्या हातात असा हा कारभार आहे. (District Bank Directors)

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल 8 संचालक हे आमदार, खासदार, मंत्री आहेत. यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार सर्वश्री पी. एन. पाटील, विनय कोरे, राजेश पाटील, राजूबाबा आवळे यांचा समावेश आहे.

District Bank Directors : नाव शेतकऱ्यांचे, सत्ता नेत्यांची

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 2 जागांवर संचालक म्हणून आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये मानसिंगराव नाईक, अनिल बाबर या दोन आमदारांचा समावेश आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकात 5 आमदार, खासदार, मंत्र्यांचा समावेश आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले व आमदार मकरंद पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अलीकडेच निवडणूक झाली. या निवडणुकीत 21 पैकी 7 संचालक हे आमदार, खासदार, मंत्री आहेत.

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भारणे, आमदार सर्वश्री संग्राम थोपटे, संग्राम जगताप, अशोकराव पवार, दिलीप मोहिते यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सध्या प्रशासक आहे; पण तेथे विसर्जित संचालक मंडळात रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक, दिलीप सोपल, दिलीप माने, सिद्धराम म्हेत्रे यांचा संचालक म्हणून समावेश आहे.

सभापती, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्रीही संचालक

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात विधान परिषदेचे सभापती, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्यासह अन्य मंत्री व खासदारांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT