Latest

Disha Patani : दिशाचे बाथरुममधील ‘ते’ फोटो व्हायरल ; चाहत्यांना पडली भुरळ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅालिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामध्ये दिसून येते. ती तिच्या फिटनेस संबंधी नेहमी चर्चेत राहते. दिशाचे बिकीनी फोटोजला आणि व्हिडिओला सोशल मीडियावर चाहते खूप पसंद करतात. ती नेहमी तिच्या बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जे अगदी जलदपणे चर्चेत येतात. दिशाचा सध्या एक बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांच्यावर्गामध्ये खूप व्हायरल होताना दिसत आहे.

दिशाचा सुपर हॉट अवतार

दिशा पटानी बऱ्याचदा तिचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांची वाहवा लुटते. तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. त्याचबरोबर दिशा तिच्या डान्स, जिमिंग आणि जिम्नॅस्टिक्सचे व्हिडिओही शेअर करत असते. ती एक फिटनेस ठेवणारी अभिनेत्री आहे.

बऱ्याचदा तिच्या याच फिटनेसची चाहत्यांवर भुरळ पडताना दिसते. सध्या तिचे सोशल मीडियावर काही फोटो खूप व्हायरल झाले आहेत. तिने तिच्या बाथरूममधील फोटो शेअर करत ती तीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना दाखवताना दिसून येत आहे. दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर ५१.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या सर्व फॅालोवर्सना आता सध्याच्या नव्या बोल्ड फोटोंची भुरळ पडली आहे. (Disha Patani)

दिशा पटानी चित्रपटासाठी घेते ६ कोटी तर जाहिरातीसाठी १ कोटी

एका रिपोर्टनुसार दिशा पटानी करोडोंची मालकीण आहे. तीचे वार्षिक उत्पन्न पहायचे झाले तर अंदाजे १२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच तिची मासिक कमाई सुमारे १ कोटी रुपये इतकी आहे. तिची एकूण संपत्ती ७४ कोटींच्या जवळपास आहे. दिशा एका चित्रपटासाठी ६ कोटी रुपये आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपये घेते. दिशा सोशल मीडियावर अनेकदा नामांकित ब्रँडच्या जाहिराती करताना दिसते.

दिशा पटानीचे आतापर्यंत केलेले चित्रपट

दिशा पटानीने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' (2016) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत भारतीय क्रिकेटर एमएस धोनीच्या भूमिकेत दिसला होता. धोनीच्या बायोपिकनंतर दिशाने जॅकी चॅनसोबत कुंग फू योगा (2017) या चित्रपटात काम केले.

'राधे' चित्रपटापूर्वी दिशाने सलमान खानसोबत भारत चित्रपटात काम केले आहे. आगामी काळात ती लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'योद्धा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'योद्धा'मध्ये दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत आहे, तर जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT