Latest

पुण्यातील ‘त्या’ अधिकार्‍याच्या बदलीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका मंडल अधिकार्‍याच्या बदलीसाठी शहरातील शिवसेनेचा एक नेता प्रयत्न करत आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच अधिकार्‍यांना फोन केल्याची चर्चा महसूल विभागात आहे. राज्यात वर्षभरापूर्वी सत्तांतर झाले. त्या वेळी शहरातील शिवसेनेच्या काही नेत्यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेतही प्रशासक कार्यरत आहेत.

त्यामुळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य नाहीत. शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या 30 जूनपूर्वी पूर्ण झाल्या आहेत. मात्र, हवेली तालुक्यातील एका मंडल अधिकार्‍यासाठी एका शिवसेना नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे हट्ट धरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना फोन केल्याची चर्चा महसूल विभागात दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे मंडल अधिकारी हे पद नायब तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाचे आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT