बनावट ताडी वाहतूक करणारा जेरबंद; नारायणगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैध ताडी विक्री वाहतूक करताना पकडलेला आरोपी. जप्त केलेली कार तसेच बनावट ताडी. (छाया : संजय थोरवे)
राज्य उत्पादन शुल्क पथकाने अवैध ताडी विक्री वाहतूक करताना पकडलेला आरोपी. जप्त केलेली कार तसेच बनावट ताडी. (छाया : संजय थोरवे)

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बनावट ताडी विक्री करण्याकरता आलेल्या एका वाहनावर सापळा रचून छापा टाकून बनावट ताडीचे ३५ लिटरचे तीन कॅन व मारुती कंपनीची वॅगनार गाडी असा एकूण ४ लाख २ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल नारायणगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. ही माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. या गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
निलेश काळुराम बोडरे (वय ४५, रा. कवठे येमाई, ता. शिरुर) असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागास दि. ३१ जुलै रोजी एक जण मागील दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात बनावट ताडी व अवैध मद्य विक्री तसेच वाहतुक करत असल्याबाबत खात्रीलायक गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने कवठे येमाई (ता. शिरूर) येथे नारायणगाव विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्री गस्त व पाळत ठेऊन होते.

दि १ ऑगष्ट रोजी कवठे येमाई गावाच्या हद्दीत टाकळी हाजी रस्त्यावर लाल रंगाचे मारुती कंपनीची वेगनार वाहन (एमएच १४ बीआर ३३०५) या चारचाकी वाहनाचा संशय आल्याने व त्यात प्लास्टीक कॅन दिसुन आल्याने या वाहनाची तपासणी करण्यात आली. या वाहनात ३५ लिटर मापाचे तीन प्लास्टीक कॅनमध्ये बनावट ताडी मिळून आली. उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह ४ लाख २ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, तसेच वाहन चालकास बनावट ताडी साठा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करुन आणल्याचे तपासातुन स्पष्ट झाल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार कारवाई केली.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्कचे संचालक सुनिल चव्हाण यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे, विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत तसेच उप- अधीक्षक युवराज शिंदे, उप-अधीक्षक एस. आर. पाटील व उप-अधीक्षक एस. वी. जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव विभागाचे निरीक्षक सुनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगड़े, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, दयानंद माने व जवान विजय विंचुरकर, जयदास दाते, संदीप सुर्वे, यांनी केली. या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक एस. एफ. टेंगडे हे करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news