Latest

Dipa Karmakar : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह; ITA ची 21 महिन्यांची बंदी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मोठा झटका बसला आहे. दीपावर इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी (ITA) ने 21 महिन्यांची बंदी घातली आहे. प्रतिबंधित पदार्थ हायजेनामाइनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ITA ने हा निर्णय घेतला. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी स्पर्धेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर तिचे नमुने घेतले होते. तिच्यावर १० जुलै २०२३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे. आयटीएने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, दीपा कर्माकरला २१ महिन्यांची बंदी घातली आहे, जी १० जुलै २०२३ पर्यंत लागू राहील. दीपाचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी घेतले होते. हायजेनामाइन (Higenamine) मिश्रित एड्रीनर्जिन हा प्रतिबंधित पदार्थ आहे. WADA ने २०१७ मध्ये प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत हायजेनामाइनचा समावेश केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT