Latest

Diego Maradona’s Hand of God : मॅराडोनाच्या ‘हँड ऑफ गॉड’ बॉलचा १९ कोटींना लिलाव!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाचा दिग्गज दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या ऐतिहासिक 'हँड ऑफ गॉड' (Diego Maradona's Hand of God) बॉलचा लिलाव काल (दि.१७) झाला. १९८६ सालच्या फुटबॉल विश्वचषकात आपल्या हातांनी प्रसिद्ध गोल करणाऱ्या मॅराडोनाचा तो चेंडू ट्युनिशियाच्या रेफरींनी सुमारे 2.4 मिलियन डॉलर (सुमारे 19 कोटी रुपये) मध्ये लिलाव केला.

विशेष म्हणजे अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात मेक्सिकोमध्ये खेळल्या गेलेल्या त्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मॅराडोनाने आपल्या हाताने विचित्र पद्धतीने गोल केला. यानंतर सामन्याचे पंच असलेल्या ट्युनिशियाच्या अली बिन नासेर यांनी चेंडू तब्बल ३६ वर्षे आपल्याजवळ सांभाळून ठेवला. तो बॉल (Diego Maradona's Hand of God) संपूर्ण सामन्यात वापरण्यात आला होता. आजच्या काळात सामन्यांमध्ये अनेक चेंडू वापरले जातात.

सहा महिन्यांपूर्वी मॅराडोनाने परिधान केलेल्या एका जर्सीचाही लिलाव करण्यात आला होता. त्या जर्सीसाठी सुमारे $9.2 दशलक्ष (75रु. कोटींहून अधिक) बोली लावण्यात आली होती. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मॅराडोनाने इंग्लंडच्या गोलपोस्टच्या जवळच्या डेंजर झोनमध्ये मध्ये धाव घेऊन इंग्लंडचा गोलरक्षक पीटर शिल्टनला चकवत हाताने गोल केला.

त्या गोलला मॅराडोनाने देवाचा हात अर्थात हँड ऑफ गॉड म्हटले होते. याच सामन्यात चार मिनिटांनी मॅराडोनाने आणखी एक ऐतिहासिक गोल केला. त्याने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना आणि गोलकीपरला चकवून करून गोल केला. त्या गोलला 'गोल ऑफ द सेंच्युरी' म्हटले गेले. तो सामना अर्जेंटिना संघाने 2-1 ने जिंकला आणि नंतर मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली त्यांनी विश्वचषक जिंकला.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT