Latest

श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला ? : शिवराज पाटील

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी काल (दि.२०) केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठवली जात आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी त्यांनी कुराण, बायबल गीता आदी धर्मग्रंथांचा संदर्भ देत भाषण केले. यावेळी त्यांनी प्रत्येक धर्मामध्ये काही शिकवण आहे. त्याचप्रमाणे कुराणमध्येही शिकवण आहे, ज्याला काहीजण जिहाद असेही म्हणतायेत. मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला शिकवले त्याला जिहाद म्हणायचे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या विधानावरून भाजप आक्रमक झाली असून पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

भाजपने शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला असून ही काँग्रेसची विचारधाराच असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आज (दि.२१) त्यांच्या बोलण्याचे विश्लेषण करत भाषणाचा चुकीचा अर्थकाढला जात असल्याचे सांगितले. यावेळी पाटील म्हणाले,मी फक्त प्रश्न उपस्थित केला, जनतेमध्ये अनेक लोक धर्मग्रंथातील अर्थ वेगळे घेऊन ते सांगतात, या प्रमाणे मी फक्त एक प्रश्न उपस्थित केले.

"हे कुराण शरीफ आहे. तुम्ही आधी ऐका. त्यात देव एक आहे आणि त्याचे कोणतेही रूप नाही, असे म्हणतात तसेच ख्रिश्चन आणि यहुदी धर्मही हेच सांगतात की देव आहे पण मूर्ती असू शकत नाही. त्याचप्रमाणे गीता असेही म्हणते की देवाला रंग आणि रूप नाही." असेही पाटील यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले आहे.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT