Latest

धर्मसंसद : कालीचरण महाराजांची जीभ घसरली, “मी नथुराम गोडसेंना सलाम करतो”

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या विविध राज्यांमध्ये 'हिंदू धर्म संसद'चे आयोजन केले जात आहे. छत्तीसगडमध्येही नुकत्याच आयोजित केलेल्या धर्मसंसद यामध्ये धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. तसेच त्‍यांनीनथुराम गोडसेचे समर्थनही केली.

यावेळी कालीचरण महाराज म्हणाले की, "धर्माच्या रक्षणासाठी एका कट्टर हिंदू नेत्याला प्रमुख बनवायला हवे." यापूर्वीही हरिद्वारमध्ये आयोजित केलेल्या धर्मसंसदेतही धर्मगुरूंनी हिंदूना शस्त्रं उचलण्यास सांगितले.

नथुराम गोडसे यांना सलाम करतो

धर्मगुरू कालीचरण महाराज महात्मा गांधी यांच्या संदर्भात अवमानकारक शब्द वापरताना म्हणाले की, " इस्लाम धर्माचे लक्ष्य हे राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर नियंत्रण ठेवणं आहे. आपल्या डोळ्यांदेखत १९४७ साली राष्ट्रावर नियंत्रण मिळवलं होतं. यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवलं होतं. राजकारणाच्या माध्यमातूनही पाकिस्तान आणि बांगलादेशावर नियंत्रण मिळवलं. मी नथुराम गोडसे यांना सलाम करतो. कारण, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली." त्यांच्या या विधानावर उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून दुजोरा दिला.

"हिंदू धर्माचे रक्षण करणे, हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. आपल्याला सरकारमध्ये एक कट्टर हिंदू राजा (राजकीय नेता) निवडून द्यायला हवा. आपल्या घरामध्ये स्त्रीया खूप संस्कारी आणि सभ्य आहे. त्या मतदानासाठी बाहेर जात नाहीत. पण, ज्यावेळी सामूहिक अत्याचार केला जाईल तेव्हा घरात बसलेल्या महिलांचे काय होईल. महामुर्खांनो… मी त्या माणसांना बोलावत आहे जे मतदान करण्यासाठी घरातून बाहेरच येत नाहीत.", असेही विधानही त्‍यांनी या वेळी केले.

हिंदुंनी धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलावीत

यापूर्वीही उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये आयोजित केलेल्या धर्मसंसद यामध्ये एक भडकाऊ भाषणाची क्लिप व्हायरल झाली हाेती . त्यानंतर वादाला तोंड फुटले. खरंतर या धर्मसंसदेत एका वक्त्याने वादग्रस्त विधानं करताना भाषणात सांगितले की, धर्माच्या रक्षणासाठी हिंदुंनी शस्त्र उचलणं आवश्यक आहे, असे त्‍यांनी म्‍हटलं हाेते.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT