Latest

Air India flight : महिलेवर लघुशंका प्रकरणी पायलटचे निलंबन मागे घेण्याची मागणी DGCA ने फेटाळली

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी एअर इंडियाने संबधीत पुरुष प्रवाशांवर विमान प्रवासासाठी 30 दिवसांची बंदी घातली होती. तसेच या विमानाच्या पायटला निलंबित केले होते. या निर्णलाया आव्हान देत या पायलटने निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) केली होती. पण एअर इंडिया (AI) ने विमानाच्या पायलटने नियमांनुसार कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचे स्पष्ट करत DGCA ने पायलटचे निलंबन मागे घेण्याची मागणी फेटाळून लावली.

२६ नोव्हेंबर, २०२२ रोजी न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केली होती. यानंतर संबंधित पुरषावर कारवाई करत, वैमानिकाला तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते. या निर्णयाला पायलट आणि युनियनने आव्हान दिले होते. परंतु, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाच्या विमानातील वैमानिकाचे निलंबन कायम ठेवले आहे.

एअर इंडियाचे (Air India) विमान जेएफके (अमेरिका) वरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला होता. पुरुष प्रवाशाच्या कृत्यानंतर महिलेने केबिन क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. पण त्यांनी त्या प्रवाशावर कसलीही कारवाई केली नाही. यामुळे विमान दिल्लीत उतरल्यानंतर तो पुरुष प्रवाशी बिनधास्तपणे निघून गेला. त्यानंतर याप्रकरणी 70 वर्षीय महिला प्रवाशाने तक्रार केल्यानंतर एअर इंडियाने कारवाईचा बडगा उचलत संबधीत पुरुष प्रवाशांवर कारवाई केली. तसेच या महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवल्यानंतरच एअर इंडियाने या प्रकाराची चौकशी सुरू केली, असे सूत्राकडून सांगण्यात आले आहे. या दरम्यान एअर इंडियानेही पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT