Latest

Devendra Fadnavis: पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी करून सरकार स्थापन केले होते. परंतु हे सरकार औटघटकेचे ठरले होते. अजित पवारांचे बंड मोडून काढण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले होते. दरम्यान या पहाटेच्या शपथविधीवर राज्यात बरीच चर्वितचर्वण सुरू होते. आता पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचाच पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही तासांसाठी स्थापन झालेल्या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधात बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. परंतु अजित पवार यांचे ते बंड होतं का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवून निवडून आले. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे सांगत होते. तेव्हा ठाकरे टाळ्या वाजवत होते. परंतु, ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना प्रिय वाटू लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार केले.

ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची चर्चा बरीच पुढे गेली आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आपण स्थिर सरकार स्थापन करुया. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी ठरल्या. त्यानंतर पुढे काय झाले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. आपल्याच व्यक्तीने केलेला पहिला विश्वासघात अधिक मोठा होता. तर दुसरा विश्वासघात छोटा होता, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, शिवसेनेत कुरबुरी सुरू झाल्या. त्यांचे लोकं बाहेर पडले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर हे सरकार चालत नसल्याचे त्यांना समजू लागले, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT