राज्य मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना नक्कीच स्थान मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन | पुढारी

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना नक्कीच स्थान मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना नक्कीच स्थान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते इंद्रायणी थडी जत्रेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जत्रेच्या उद्घाटनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला बचतगटांच्या व्यवसाय वाढीसाठी होत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. हाच धागा पकडून पत्रकारांनी फडणवीस यांना विचारणा केली.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामध्ये एखाद्या महिल स्थान मिळणार का? त्यावर 100 टक्के स्थान मिळेल, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. सत्यजित तांबे यांनाच विचारलेले बरे नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना पाठिंबा देणार का, अशी विचारणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली असता ते म्हणाले, सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. त्यामुळे आता तेथील नेमकी परिस्थिती काय आहे, हे माझ्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे, असे उत्तर देऊन फडणवीस यांनी या प्रश्नाला बगल दिली.

Back to top button