Latest

अजित पवार आडवा आला तरी उचला; सभेत उपमुख्यमंत्र्यांची पोलीस उपअधीक्षकांना सूचना

अविनाश सुतार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ७) बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी तुफान फटकेबाजी केली. एका नागरिकाने जागेची मोजणी सुरु असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नाही, असे सांगितल्यावर अजित पवार संतापले. त्यांनी थेट उपस्थित असलेल्या पोलीस उपअधीक्षकांना आदेश देत एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पहा, नाहीतर या प्रकरणात अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला, असे आदेश दिले.

पवार यांच्या काटेवाडी गावात 'एक तास राष्ट्रवादी'साठी या उपक्रमांतर्गत आयोजित सभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढाच पवार यांच्यापुढे वाचला. त्यावर पवार यांनीही आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली. कार्यक्रमात एका नागरिकाने जागेची मोजणी सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नाही, असे सांगितल्यावर मात्र अजितदादा संतापले आणि त्यांनी थेट उपस्थित असलेल्या पोलीस उपअधीक्षकांना आदेश दिला. यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला, असे सांगत पवारांनी त्यावर तोडगा सुचवला.

त्यानंतर एका ग्रामस्थाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेलेय. पण त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सुचना देत होते. याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गाची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे २ टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT