Latest

Deltacron : ब्रिटनमध्‍ये आढळला कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ‘डेल्‍टाक्रॉन’, आरोग्‍य सुरक्षा विभाग म्‍हणाला…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट 'डेल्‍टाक्रॉन' असल्‍याचे आता स्‍पष्‍ट झाले आहे. ( Deltacron ) यापूर्वी प्रयोगशाळांमधील त्रुटींमुळे असा व्‍हेरियंट तयार झाला असावा, असा अंदाज व्‍यक्‍त केला केला. मात्र ब्रिटनमध्‍ये ओमायक्रॉन आणि डेल्‍हा या दोन व्‍हेरियंटपासून हायब्रिड स्‍ट्रेनचे काही रुग्‍णमिळाले असून हा कोरोनाचा हा नवा व्‍हेरियंट 'डेल्‍टाक्रॉन'बाबत ब्रिटनची आरोग्‍य सुरक्षा विभाग हा चिंतेत नाही. कारण याचे रुग्‍ण खूपच कमी आहेत.

Deltacron : काय आहे 'डेल्‍टाक्रॉन'?

ब्रिटनमधील डेली मेलमधील रिपोर्टनुसार, कोरोनाचा नवा व्‍हेरियंट एका रुग्‍णांमध्‍ये आढळला. या रुग्‍णाला एकाचवेळी ओमायक्रॉन आणि डेल्‍टा या दोन्‍ही व्‍हेरियंटची लागण झाली होती. या रुग्‍णाला झालेला संसर्ग ब्रिटनमध्‍येच झाला की अन्‍य देशामध्‍ये तो बाधित झाला हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या नव्‍या हेरियंट आढळलेल्‍या रुग्‍णाचे आरोग्‍य सामान्‍य असून आतापर्यंत तरी त्‍याला कोणताही धोका नाही.

Deltacron : 'डेल्‍टाक्रॉन' गंभीर स्‍वरुपाचा नाही

ब्रिटनमधील 'युकेएचएसए'च्‍या अधिकार्‍याने दावा केला आहे की, कोरोनाचा नवा व्‍हेरियंट डेल्‍टाक्रॉन संसर्ग गंभीर स्‍वरुपाचा नाही. या व्‍हेरियंटची लागण झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये कोणती लक्षणं आढळतात, लसीकरण झालेल्‍यांवर याचा कोणता परिणाम होतो, हे अ्‍द्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. संसर्गजन्‍य रोगांचे विशेष तज्‍ज्ञ पॉल हंटर यांनी म्‍हटलं आहे की, या नव्‍या व्‍हेरियंटमुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण ब्रिटनमध्‍ये डेल्‍टा आणि ओमायक्रॉनशी लढणारी प्रतिकारकशक्‍ती सध्‍या आहे. त्‍यामुळे सध्‍या तरी मला डेल्‍टाक्रॉममुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण सध्‍या डेल्‍टा आणि ओमायक्रॉनचे रुग्‍ण कमी होत आहे. त्‍यामुळे हा नवा व्‍हेरियंटलाच विस्‍तारासाठी संघर्ष करावा लागेल".

'डेल्‍टाक्रॉन'बाबत 'डब्ल्यूएचओ' काय म्‍हणाले?

'डेल्‍टाक्रॉन'बाबत 'डब्ल्यूएचओ'ने स्‍पष्‍ट केले आहे की, एखाद्‍या व्‍यक्‍तीला विषाणूच्‍या दोन व्‍हेरियंटची लागण होवू शकते. असे अनेक उदाहरण आहेत. कोरोना महामारी काळात काहींना कोरोनासोबतच फ्‍लूचीही लागण झाली होती. 'डब्ल्यूएचओ'च्‍या मारिया वॉन यांनी मागील महिन्‍यात म्‍हटलं होते की, डेल्‍टाक्रॉन'सारख्‍या शब्‍दाचा वापरच करु नका. कारण सध्‍या तरी अशा प्रकारचा व्‍हेरियंट दिसत नाही.
डेल्‍टाक्रॉनचा शोध हा सायप्रस येथील प्रयोगशाळात डेल्‍टाक्रॉनसारखा नवा व्‍हेरियंट येवू शकतो, असे संकेत मिळत होते. मात्र येथील प्रयोगशाळेतील त्रुटीमुळे अशी शक्‍यता निर्माण झाली होती. त्‍यामुळे नवा व्‍हेरियंट धोकादायक आहे, असे समजून घारबरण्‍याचे कारण नाही, असे युरोपमध्‍ये वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी म्‍हटलं होते.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT