Latest

 Delhi Rain Update: दिल्लीत पावसाने तोडला 41 वर्षांचा विक्रम, उत्तर भारतातही तुफान पर्जन्यवृष्टी

मोनिका क्षीरसागर
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीत पावसाने आपला चार दशकांचा विक्रम मोडला आहे. शनिवारचा पूर्ण दिवस ते रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत राजधानीत 153 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसभर देखील दिल्लीत (Delhi Rain Update) पावसाचे धुमशान होते.
एका दिवसात जास्त पाऊस पडल्याच्या वर्षांचा विचार केला तर 2013 रोजी 123.4 मिलिमीटर व 2022 साली 117 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर 2003 साली एका दिवसात 133.44 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. 1982 साली 170 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती.  सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद 21 जुलै 1958 रोजी झाली होती. त्या दिवशी तब्बल 266.2 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता. सातत्यपूर्ण पावसामुळे दिल्लीतले जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. सखल भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पावसामुळे वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला ( Delhi Rain Update) आहे.

Delhi Rain Update: उत्तर भारतातही तुफान पर्जन्यवृष्टी

सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दिल्लीत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. पश्चिमी विक्षोभ आणि मान्सून याच्या परिणामी उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसामुळे पूर आला आहे. शनिवारी चंदीगडमध्ये 322.2 मिलिमीटर, अंबाला येथे 224.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार उडविला असून या राज्यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि प्राणहानी ( Delhi Rain Update) झाली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT