Latest

दिल्ली महापौरपदाच्या उमेदवारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; दिल्ली महानगरपालिकेत बहुमत असलेल्या आम आदमी पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार डॉ. शैली ओबेरॉय यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. ३ फेब्रुवारीला ओबेरॉय यांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी घेणार आहे. कालबद्धरित्या महापौर पदाची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून त्यांनी केली आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) महापौर पदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्यासंबंधी ओबेरॉय यांनी युक्तिवाद केला. डिसेंबर महिन्यात एमसीडीची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे असतानाही आतापर्यंत महापौर पदाची निवडणूक अद्याप होवू झालेली नाही.

९ तसेच २४ जानेवारीला महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली होती. पंरतु, दोन्ही वेळा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाल्याने ही निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतल्याने महापौर पदाची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT