Latest

Nirbhaya Fund : निर्भया फंडातील वाहने शिंदे सरकारमधील आमदारांच्या Y+ सुरक्षेसाठी; जया बच्चन यांचा आरोप

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिंदे सरकारमधील आमदारांना Y+ ही सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र या सुरक्षेत देण्यात आलेली वाहने ही निर्भया फंडातून खरेदी केलेल्या आहेत, असा आरोप समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी केला आहे. सोमवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्या म्हणाल्या की, मी अशा लोकांसाठी काय बोलू ? ज्यांनी इतका लज्जास्पद प्रकार केला आहे. निर्भया फंडाचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तींनी राजीनामा द्यावा आणि सर्व महिलांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सपाच्या खासदार म्हणाल्या की, निर्भया कुटुंबियांशी या सरकारने माफी मागावी. तसेच निर्भया सारख्या इतर कुटुंबियांची देखील त्यांनी माफी मागणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी अशा लोकांना गुर्मी आहेत अशी टीका देखील केली. असे असंवेदनशील लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत असे आरोप देखील त्यांनी यावेळी केले.

खरतर महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत मुंबई पोलिसांनी यावर्षी काही वाहने खरेदी केलेली होती. मात्र या वाहनांचा शिंदे गटाच्या शिवसेनेतील आमदारांच्या वाय प्लस सुरक्षेकरिता वापर केला जात आहे.

मुंबई पोलिसांनी निर्भया फंडाअंतर्गत काही वाहने खरेदी केलेल्या होत्या. याचा तपशील पुढे दिलेला आहे. ३० कोटीहून अधिक खर्च या वाहन खरेदीकरिता झालेला आहे. खरेदी केलेल्या वाहनांमध्ये २२० बोलेरो, ३५ ईर्टिगा.३१३ पल्सर बाईक आणि २०० अॅक्टिव्हा ही वाहने आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT