Latest

Delhi AAP Protest : दिल्लीत ‘आप’चे भाजपच्या मुख्यालयासमोर आंदोलन; तणावाची परिस्थिती

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंदीगडच्या महापौर निवडणुकीचा मुद्दा राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत कथित हेराफेरीच्या विरोधात आम आदमी पार्टी आज (दि.२) दिल्लीतील भाजप मुख्यालयाजवळ निदर्शने करणार आहे. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात येणार आहेत. सिंधू बॉर्डरपासून भाजप कार्यालयापर्यंत वाढीव दक्षता करण्यात आली आहे. (Delhi AAP Protest)

सध्या चंदीगडच्या महापौर निवडणुकीचा मुद्दा खूप चर्चेत आहे. हा मुद्दा राजधानी पर्यंत गेला आहे. चंदीगड निवडणुकीतील कथित फसवणुकीबद्दल आज आप दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मात्र, पोलिसांनी निदर्शनास परवानगी दिलेली नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर डीडीयू मार्ग आणि विष्णू दिगंबर मार्गाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेसाठी वाहनांची तपासणी केली जात आहे.दरम्यान, भाजपने म्हटले आहे की त्यांचे सदस्य अरविंद केजरीवाल सरकारच्या "भ्रष्टाचार" विरोधात आप मुख्यालयाजवळ आंदोलन करतील. (Delhi AAP Protest)

भाजप इतकी का घाबरली आहे? :  आतिशी

आज दिल्लीत आपच्या निषेधाबाबत, दिल्लीच्या मंत्री आतिशी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की," चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  फसवणूक झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज (दि.२) दिल्लीत या मुद्द्यावर शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनापूर्वी पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. संपूर्ण दिल्लीत बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि आपच्या आमदारांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही  नजरकैदेत ठेवले जात आहे. भाजप इतकी का घाबरली आहे.?

आप नेते सौरभ भारद्वाज बोलताना म्हणाले की, "चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने कशी फसवणूक केली हे देशाला माहीत आहे. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान आज भाजप कार्यालयात शांततापूर्ण आंदोलन करणार आहेत. आमचे आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना दिल्लीत ठिकठिकाणी ताब्यात घेतले जात आहे. अरविंद केजरीवाल यांना भाजप इतका घाबरला आहे का की ते हे आंदोलन होऊ देत नाहीत?

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT