Latest

Deepika Padukone : दीपिका हॉट आणि ग्लॅमरस

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) यांच्या 'पठाण' चित्रपटाचे पहिले गाणे 'बेशर्म रंग' नुकतेच रीलिज झाले आहे. या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 'बेशर्म रंग' या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे.

भगव्या रंगाची बिकिनी घालून बोल्ड सीन देत दीपिकाने ( Deepika Padukone ) भारतीय संस्कृतीचा अपमान केला असल्याचा आरोप केला जात आहे. या वादावर आतापर्यंत बॉलीवूडसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाला की, दीपिकाला तिच्या आतापर्यंतच्या सर्वात ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात मला या गाण्यात दाखवायचे होते. ही गोष्ट मी माझ्या टीमला सांगितली आणि दीपिकाला अशा अंदाजात दाखवणं हा आमचे मिशन बनले. हे मिशन पूर्णसुद्धा झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT