पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 'फायटर' हा चित्रपट आता वादात सापडला आहे. या चित्रपटात हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये हृतिक आणि दीपिका किस करताना दिसत आहेत. (Fighter) विशेष म्हणजे, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांनी एअरफोर्सचा गणवेश परिधान केलेला आहे. यानंतर आसाममध्ये तैनात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विंग कमांडरनी या सीनवर आक्षेप घेतला आहे. दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. (Fighter)
संबंधित बातम्या –
विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटले की, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा किसिंग सीन हा हवाई दलाच्या गणवेशाचा अपमान आहे. हा गणवेश देशाच्या संरक्षणासाठी त्याग, शिस्त आणि अखंड समर्पणाचे प्रतीक आहे. तो केवळ कापडाचा तुकडा नाहीये. हा हवाई दलाच्या गणवेशाचा अनादर आहे. चित्रपटात रोमँटिक दृश्ये दाखवण्यासाठी या पवित्र चिन्हाचा वापर करणे चुकीचे आहे.
हा सीन हटवण्याबाबत आणि सार्वजनिकपणे माफी मागण्याची मागणी केली आहे. निर्मात्यांना एअर फोर्सची आणि सार्वजनिकपणे माफी मागावी.