Latest

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षपदी दिपक मानकर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शहराध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मानकर यांनी गुरुवारी निवडीचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी संघटनात्मक निवडी सुरू केल्या आहेत. याची सुरुवात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात असलेल्या पुणे जिल्ह्यापासूनच केली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी मानकर यांची निवड केली. त्यांच्या निवडीने अजितदादा गटाला शहरात ताकद मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या गटाच्या महिला शहराध्यपदासाठी प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील, तर युवक शहराध्यक्षपदासाठी समीर चांदेरे यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया भक्कम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात शहर पिंजून काढून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. पुणेकरांच्या प्रश्नांना न्याय देतानाच कार्यकर्त्यांना न्याय देणे, हा मुख्य अजेंडा काम करताना असणार आहे.

– दीपक मानकर, नवनिर्वाचित शहराध्यक्ष.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT