Latest

Israel-Palestine War : इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यातील मृतांची संख्या १०० वर, जखमी ९०० हून अधिक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या  रॉकेट हल्ल्यातील मृतांची संख्‍या 100 वर पोहचली आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे. (Hamas rocket attack)  दरम्‍यान, इस्रायलमध्‍ये प्रचंड तणाव असून, केंद्र सरकारने इस्रायलमधील भारतीयाना सतर्क राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

इस्रायलच्‍या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, रॉकेट हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या ९०० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, दहशतवादी संघटना हमासच्‍या दहशतवाद्यांनी देशाच्या दक्षिणेकडील अनेक भागात घुसखोरी केली आहे. तसेच पाच सैनिकांचे अपहरणही केले आहे.

या हल्ल्यानंतर याशिवाय मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. दरम्यान, हमासने काही व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत. या फुटेजमध्ये हमास दहशतवादी हल्ल्यादरम्यान इस्रायली दहशतवाद्यांना पकडताना दिसत आहे. गाझा दहशतवादी संघटनेने शनिवारी (दि. ७) सकाळी इस्रायलवर अतिशय धोकादायक हल्ला केला. या काळात हजारो रॉकेट डागण्यात आले आणि वेगवेगळ्या बाजूंनी घुसखोरांनी लोकांना लक्ष्य केले.

हमासचा दहशतवादी कमांडर मोहम्मद देईफ याने इस्रायलवर जोरदार हल्‍ल्‍याचा इशारा दिल्याचे वृत्त जेरुसलेम पोस्टकडून माहिती देण्यात आली. दरम्यान, अनेक जागतिक नेत्यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. हमासच्या सैनिकांची घुसखोरी आणि गाझामधून क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलने देशात आधीच युद्ध स्थिती जाहीर केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT